Health

[business][bleft]

Technology

[technology][bsummary]

Business

[business][twocolumns]

Search This Blog

Powered by Blogger.

तिच्या स्वप्नात आला नाग आणि तिने ठरवले त्याच "नागा" शी करणार लग्न, वाचा अजब प्रकार...

दोन परिवारांना एकत्र जोडण्याची परंपरा म्हणजे लग्न ही गोष्ट असते. पण मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथील एक तरूणी चक्क स्वप्नात आलेल्या नागाशी लग्न करायला निघाली आहे. ही तरूणी मंदिरातील नागदेवता माझ्याशी लग्न करणार असून मी नागिन असल्याचा दावा करत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. छिंदवाडा येथील धमनिया गावातील ही घटना आहे. या गावातील एक तरूणी आपल्या स्वप्नात नाग देवता आली असून ती माझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले आहे.
यानंतर ही तरूणी वधूच्या वेशात मंदिरात जावून नागाला शोधत होती. यावेळी ती नागासारखे हावभाव ही करत होती. तसेच ती जोरजोराने नागाला हाका मारत होती. तसेच ही तरूणी नागरिकांना शांत होण्यास सांगत होती की, जेणेकरून नाग तेथे येईल असे तिला वाटत होते. मंदिरात आल्यावर या तरूणीला एका महिलेने धरले असल्याचे व्हिडिओत दिसत होते. ही तरूणी अंधविश्वासातून असे कृत करत असल्याचे दिसत आहे. यामुळे गावातील अनेक नागरिकांनी हे पाहण्यासाठी मंदिर परिसरात एकच गर्दी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

No comments:

Ads 4